मनसेच्या मुस्लिम कार्यकर्त्याचा राज ठाकरेंच्या माहीम दर्ग्याच्या भूमिकेला पाठिंबा | Raj Thackeray

2023-03-28 270

एकीकडे मुंब्रा शहरातील मुस्लिम बांधवांनी मनसेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असताना दुसरीकडे मनसेच्या मुस्लिम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मात्र राज ठाकरे आणि मनसेने घेतलेल्या भूमिकेचं जोरदार स्वागत केले आहे. इतकंच नव्हे तर राज ठाकरे यांच्या प्रतिमेस आपल समर्थन सिद्ध करण्यासाठी इरफान सय्यद या कार्यकर्त्याने चक्क यांच्या फोटोस दुधाचा अभिषेक केला. "राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका अत्यंत योग्य असून ते कोणत्याही धर्माच्या विरोधात नाहीत. माहीम इथली मजार अनधिकृत होती त्यामुळेच ती हटवली. त्याचप्रमाणे मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामे संबंधी तक्रार केली असून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर कारवाई झालीच पाहिजे" असा ठाम पवित्र आपण घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी मुंब्रा येथील असंख्य मुस्लिम बांधवांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.